Monday 1 June 2015

मृत्युञ्जयता : एक अघटीत आपत्ती (I)



…………………………..(1)…………………………..  
ते कधीच  झोपलेले डोळे निरंतर आकाशात पाहत होते, ना चंद्र दिसत होता ना चांदणे, जणू संपूर्ण आकाशच अंधाराने गिळंकृत केले आहे.समोरच अथांग समुद्रही त्या काळोखाच्या अधीन झाला होता. तो एकमेव पाण्याचा झरा सुद्धा किंचाळत असल्यासारखा भासत होता. जिकडे बघावे तिकडे काळोखाच काळोख पसरलेला होता. काळोखशिवाय होती ती काळोखाची एकमेव संगिनी स्तब्ध करणारी जंगलातली भयाण शांतता अगदी झाडाचे पानही भीतीने डुलत नसल्याचा भास करणारी ती भयावह शांतता.


त्या भयाण शांतातेसोबत तोही तितकाच शांत होता, त्याला ना भूक लागत होती ना तहान लागत होती.त्याच्या डोळ्यांनी झोप कधी अनुभवली नव्हती. तो कधी रडला नव्हता नि कधी हसला ही नव्हता, दुख, आनंद ,रोमांच, उत्कटता ह्या सर्व भावनांच्या पलीकडे, दूर कोठेतरी तो भरकटलेला होता. काहीतरी शोधत होता. तो अचल होता, दूरवर अनंतात कुठेतरी तो पाहत होता,एका थंडगार हवेच्या झुळकेने तो भानावर आला. इथे त्याचे दोनच तर साथीदार होते, जे तो जिवंत असल्याची किंबहुना जगत असल्याची जाणीव करून देत होते. एक तर हि थंड वाहणारी हवेची झुळूक आणि दुसरा तो जीवथ
जीवथ शांतपणे हिरव्यागार गवतामध्ये पहुडलेला होता, तो कधी समुद्रात असायचा तर कधी गवतात, पण तो कोठेही असो , चातुर्गतच्या एका हाकेवर लगेच हजार व्हायचा. चातुर्गत मंद पावलाने जीवथच्या जवळ गेला ,तो जवळ जाताच जीवाथने नाकपुड्या फुरफुरत एक प्रेमळ शिळ दिली.दोन फुट व्यासाच्या त्या नाक्पुड्यातून आलेल्या गरम हवेमुळे चातुर्गतचे सारे अंग थिरकले.चातुर्गत जीवथ च्या शेजारी जाऊन थांबला,त्याच्या हिरव्यागार चमकणाऱ्या बुब्बुळांचा प्रकाश हा चातुर्गाताच्या अंगावर पडत होता. चातुर्गात पुन्हा मंद पावलाने जीवथच्या अगदी जवळ गेला,तो जवळ जाताच जीवाथने नाकपुड्या फुरफुरत एक प्रेमळ शिळ दिली.
दोन फुट व्यासाच्या त्या नाकपूड्यातून आलेल्या गरम हवेमुळे चातुर्गताचे सारे अंग थिरकले.चतुर्गत जीवथ च्या शेजारी जाऊन थांबला,त्याच्या हिरव्यागार चमकणाऱ्या बुब्बुलांचा प्रकाश हाचातुर्गाताच्या अंगावर पडत होता.त्या काळोखातही जीवथच्या फूट व्यासाच्या चमकणाऱ्या बुब्बुळामध्यचतुर्गत स्वत:ला पूर्णपणे पाहत होता. तो आता आधीसारखा गोरा रहिलेला नव्हता,त्याचे सर्वांग काळेभोर झाले होते, त्याच्या कमरेवर वाघाची कातडी गुंडाळलेली होती,त्याचे पाच फूट आठ इंचाचे बेढभ स्तुल शरीर हे आता सात फुटी पिळदार शक्तिशाली शरीरामध्ये रुपांतरीत झाले होते,त्याची नखे रुंद आणि वज्राप्रमाणे कठीण झाली होती,त्याची नजर हजारो मैल पाहू शकत होतीत्याचे कान लाखो मैलापर्यंत ऐकू शकत होती आणि त्याची चेतना ही ब्रम्हांडमध्ये कुठेही फिरू शकत होती.
इतके असूनही कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचा भूतकाळ आठवत नव्हता, काही अंधुक आठवणी आजही त्याच्या डोळ्यासमोर होत्या.कोठून आला तो? कोठून आली ही शक्ती? ह्या प्रश्नचा विचार करणेच त्याने बंद केले होते.
पण त्याची जिज्ञासा कुठेतरी कळी फुलवू पाहत होती.शंभर किलो वजनाच्या आपल्या दणकशरीराला सावरत त्याने हळुवार जीवथ च्या पायवर पाय ठेवला,आणि एका झेपेत त्याच्या पाठीवर चढला जीवथच्या पाठीचे कवच अगदी मजबूत होते,२० बाय ३० फुटाच्या त्या दणकट पाठीवर हळुवार पणे पुढे सरकत तो जीवथच्या मानेजवळ आला. सवयीप्रमाणे जीवाथाने अलगतपणे आपली मान कवचाच्या आत ओढून घेतली, आणिपुन्हा बाहेर काढून गवत खाण्यात गुंग झाला. हजारो मैल मैदानावर गवतच गवत पसरले होते
गवत,गर्द झाडी हवा, पाणी, जीवाथ, चातुर्गत आणि तो अथांग समुद्ह्याव्यतरिक्त ह्या गृहावर कुठलाच जीव किंवा प्राणी नव्हता. चतुर्गातची शक्ती अचाट होती तो भूत भविष्य आणि वर्तमान पाहू शकत होता, पण स्वत:बद्दल त्याला काहीच माहिती नव्हते,कदाचित जीवथ काही सांगू शकेल, कारण तो हि दैवी शक्तींचे सामर्थ्य ठेवत होता.
ह्या वेळी नवीन काहीतरी दिसेल ह्या आशेने पुन्हा एकदा त्याने शेवटीचा प्रयत्न म्हणून त्याचा हात हलकाच जीवथच्या डोक्यावर ठेवला, समुद्र, अथांग समुद्र, आणि अचानक त्याला आठवण्यास सुरुवात झाली, समुद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल काढण्याचे काम चालू होते, त्याने स्वत;ला तिथे पहिले, त्यच्या अंगावर एक जाडसर कोट होता, त्याच्या डोक्यावर पिवळा हेल्मेट होता, त्याच्या छातीवर डाव्या बाजूस Er.. अशी अक्षरे लिहिली होती, त्याचे नाव मात्र त्याला दिसत नव्हते. काहीतरी विपरीत होणार होते. तो बघत होता, एक कर्कश्य भोंगा जोरात वाजण्यास सुरुवात झाली. सगळे सैरावैरा धावत होते, आणि काही समजण्याच्या आतच एक गगनभेदी लाट त्यांच्यावर आदळली, आणि म्हणता म्हणता तो पाण्याखले ओढला गेला, तो दहा एक फुट खाले जातोच जातो , तो समुद्रतलावर एक भलामोठा विस्पोट झाला,त्याचा प्रकाश इतका तीव्र होता कि चातुर्गत शेकडो फूट खोल पाहू शकत होता.
हजारो किलोचा पोलादाचा जिना पाण्याखाले जात होता ,आणि दुर्दैवाने त्याच्या एका साखळीत चातुर्गाताचा पाय अडकला, तो प्रंचंड वेगाने पाण्याखले जात होता, पाण्याखालची जमीन दुभंगत होती, आणि मधोमध दुभंगलेल्या भेगीतच चातुर्गत फेकला जात होता, इतक्यात त्याच भेगीतून त्याच ठिकाणी एक भलामोठा कासव बाहेर आला,तो भक्कम पोलादी जिना त्या कासवाच्या कवच्यावर आदळला आणि जिण्याचे तुकडे झाले,चातुर्गातने डोळे उघडले, अनेक वेळा त्याने इतकेच बघितले होते , आणि ह्या वेळी पण त्याला एवढेच दिसले
चातुर्गताने आपले अंग मागे टाकले आणि आकाशाकडे बघत जीवथच्य पाठीवर पहुडला,एक तेजस्वी तारा चातुर्गतला दिसला,चातुर्गतचे भाव बदलेले , तो उठून बसला एका झेपेत त्याने ३० फुटावरून खाले उडी मारली.जीवथ ही सावध स्थितीत त्याच्या मागे उभा राहिला,काही सेकंदातच एक पांढराशुभ्र तेजस्वी रथ आकाशातून खाले उतरला
अगदी थकलेले शरीर तरीही चालीमध्ये एक विशिष्ठ लयाबाधत्ता, पाच फूट पाच इंचाचा एक तेजस्वी पुरुष त्या रथातून खाले उतरला,त्याची मुद्रा चिंताग्रस्त होती.ओठ सुरकुतलेले तरीही अजून लाली होती,सोन्याचे मुकुट आणि तशाच पिवळ्या रंगाचे पितांबर होते
त्या तेजस्वी पुरुषाच्या चेहऱ्यावरची भयग्रस्त चिंता हि सूर्याला ग्रहण लागल्या प्रमाणे वाटत होती. पुढे जाऊन कंबरेत वाकून चातुर्गाताने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. "प्रणाम गुरुवर्य " चातुर्गतच्या मुखातून नम्र स्वर बाहेर आले. एक मंद स्मिथ करत त्या तेजस्वी पुरुषाने आपला हात चातुर्गतच्या वाकलेल्या पाठीवरून फिरवला
सारे ब्रम्हांड आम्हाला चित्रगुप्त नावानेच हाक मारते, आज प्रथमत: आम्हाला गुरु ही उपाधी लाभली. "इतके चिंताग्रस्त का" ? हलकेच चातुर्गतने विचारले."चला थोडी सैर घेऊ " खोटे हसत चित्रगुप्ताने उद्गार काढले. त्या हिरव्यागार गवतावर ती दोघे संथ पावलाने चालत होती, "तुला काळोखाची सवय झाली तर,...." चातुर्गत काहीच बोलत चालत होता, काहीतरी विपरीत होण्याची चाहूल त्याच्या मनाला लागली होती

" आज अखेर ब्रम्हलोकात सभा झाली." मंद स्वरात चित्रगुप्त बोलत होते, चातुर्गात शब्द शब्द सावधपणे ऐकत होता, चित्रगुप्त बोलत होते, "ब्रम्हाजीचा आदेश आला, सगळे काही सुरळीत होते, काय हे संकट आले आणि विपरीत झाले सर्व. यमराजजी आता नरकाचे अधिपती नाहीत, ते कुठे आहेत कोणालाच कल्पना नाही. नरकाचे अधिपत्य आता देवी यामिच्या हाती देण्यात आले, त्यांचे अधिपत्य हे बऱ्याच जणांना मंजूर नाही.चारित्र्यहीन स्त्री म्हणून आजही बरेच देवलोक बोलतात, यमी वर हि जबाबदारी म्हणजे खरेच जीवघेणी आहे.ती कशी काय सामोरी जाईल ब्र्म्हजीनाच ठाऊक. आमचे पिताश्रीपण असे काही निर्णय घेतात कि.... असो उद्या स्वर्गलोकात ह्याचा विधी पार पडेल,ह्या सगळ्यांची चाहूल आम्हाला आधीच होती,त्यामुळे वेळेआधी देवी यामिचे शस्त्र,अस्त्र आणि वाहन तयार करणे गरजेचे होते,कारण नरकाच्या दृष्टीने देवी यामिचे वाहन आणि शस्त्रे सोयीस्कर नव्हते,म्हणूनच आम्हाला तुला आणि जीवथला इथे बोलवावे लागले." "भूलोकात तर तू एक वर्षे आधीच मरण पावलास, तेव्हा पासून तू इथे आहेस, ह्या कालावधीत आम्ही तुला सर्व दैवी विद्या शिकवल्या . तुझे दोन कर्तव्य असणार आहेत एक म्हणजे जिवथ ची काळजी घेणे, आणि देवी यामिचे सारथ्य करणे. आणि आणखीन गोष्ट म्हणजे" .... बोलता बोलता चीत्रगुप्ताचा आवाज स्तब्ध झाला. आम्ही तुला सर्व विद्या शिकवल्या पण कुठले शस्त्र तुला दिले नव्हते. "गुरुवर्य, मी समजलो नाही", नकळत चातुर्गात बोलून गेला,चित्रगुप्ताने आपले डोळे बंद केले आणि काही मंत्र पुटपुटले. त्याच्या समोर केलेल्या तळहाततून तेजस्वी किरणे बाहेर येत होती,आणि काही क्षणात त्यच्या एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात कटनी प्रस्तापित झाली
चातुर्गात डोळे फाडून ते दिव्य शस्त्र पाहत होता, त्याला त्या शास्त्राच्या शक्तीची पूर्णपणे कल्पना होती, युद्ध सुरु होणाच्या आधीच संपवून टाकण्याची त्यात शक्ती होती. "क्षमस्व ,क्षमस्व, मी हे स्वीकार करू शकणार नाही..." चातुर्गत पुन्हा कळवळला. "चातुर्गत...," चीत्रागुप्ताचा आवाज दीर्घ आणि कठोर होत होता "यमराजजी गेले , आमचीही सेवा इथेच संपली, घ्या आता ब्रम्हांडाचा लेख जोगा तुम्ही सांभाळा. स्वीकार करा, चतुर्गत स्वीकार करा आमची गादी. इच्छेविरुद्ध चातुर्गाताचे हात पुढे जात होते, चित्रगुप्ताने काही मंत्र म्हणण्यास सुरुवात केली, आणि नकळत चातुर्गताच्या हृदयात ते पठन होत होते, तोच चमकणारी किरणे चातुर्गताच्या हातावर येण्यास सुरुवात झाली, प्रत्येक जीवजंतूची काळजी घे, जास्त क्रूर नको होऊस आणि जास्त दयावानाही नाही, जे आहे तेच लिहित जा. चतुर्गत शुन्य नजरेने त्यांच्याकडे पाहत होता, त्यांचा रथ हा आकाशात दूरवर जात होता, प्रणाम करायचेही चातुर्गातला भान राहिले नव्हते. इतक्यात गरम हवेच्या झोताबरोबर तो भानावर आला, जिवथ मागेच उभा होता, चातुर्गतची बैचानी त्यालाही असह्य होत होती. त्याने नकळत जिवथला मिठी मारली, त्याच्या मनात असंख्य प्रश्न उभे होते, काय प्रतिकिया द्यावी हे हि त्याला नीट उमजत नव्हते. पण त्याला इथेच स्वता:लाच सावरायचे होते, त्याला सांभाळणारा तोच होता, त्याची मदत तोच करू शकत होता. कधिच संपणाऱ्या एक दुर्गम प्रवासाला तो निघाला होता. जिथून माघार येणे अशक्य त्या भयाण शांतातेसोबत तोही तितकाच शांत होताची नजर हजारो मैल पाहू शकत होती. त्याचे कान लाखो मैलापर्यंत ऐकू शकत होती आणि त्याची चेतना ही ब्रम्हांडमध्ये कुठेही फिरू शकत होती. इतके असूनही कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचा भूतकाळ आठवत नव्हता, काही अंधुक आठवणी आजही त्याच्या डोळ्यासमोर होत्या.कोठून आला तो? कोठून आली ही शक्ती? ह्या प्रश्नचा विचार करणेच त्याने बंद केले होते.पण त्याची जिज्ञासा कुठेतरी कळी फुलवू पाहत होती.शंभर किलो वजनाच्या आपल्या दणकशरीराला सावरत त्याने हळुवार जीवथ च्या पायवर पाय ठेवला,आणि एका झेपेत त्याच्या पाठीवर चढला जीवथच्या पाठीचे कवच अगदी मजबूत होते,२० बाय ३० फुटाच्या त्या दणकट पाठीवर हळुवार पणे पुढे सरकत तो जीवथच्या मानेजवळ आला. सवयीप्रमाणे जीवाथाने अलगतपणे आपली मान कवचाच्या आत ओढून घेतली, आणि पुन्हा बाहेर काढून गवत खाण्यात गुंग झाला. हजारो मैल मैदानावर गवतच गवत पसरले होते. गवत,गर्द झाडी हवा, पाणी, जीवाथ, चातुर्गत आणि तो अथांग समुद्ह्याव्यतरिक्त ह्या गृहावर कुठलाच जीव किंवा प्राणी नव्हता. चतुर्गातची शक्ती अचाट होती तो भूत भविष्य आणि वर्तमान पाहू शकत होता, पण स्वत:बद्दल त्याला काहीच माहिती नव्हते,कदाचित जीवथ काही सांगू शकेल, कारण तो हि दैवी शक्तींचे सामर्थ्य ठेवत होता. ह्या वेळी नवीन काहीतरी दिसेल ह्या आशेने पुन्हा एकदा त्याने शेवटीचा प्रयत्न म्हणून त्याचा हात हलकाच जीवथच्या डोक्यावर ठेवला, समुद्र, अथांग समुद्र, आणि अचानक त्याला आठवण्यास सुरुवात झाली, समुद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल काढण्याचे काम चालू होते, त्याने स्वत;ला तिथे पहिले, त्यच्या अंगावर एक जाडसर कोट होता, त्याच्या डोक्यावर पिवळा हेल्मेट होता, त्याच्या छातीवर डाव्या बाजूस Er.. अशी अक्षरे लिहिली होती, त्याचे नाव मात्र त्याला दिसत नव्हते. काहीतरी विपरीत होणार होते. तो बघत होता, एक कर्कश्य भोंगा जोरात वाजण्यास सुरुवात झाली. सगळे सैरावैरा धावत होते, आणि काही समजण्याच्या आतच एक गगनभेदी लाट त्यांच्यावर आदळली, आणि म्हणता म्हणता तो पाण्याखले ओढला गेला, तो दहा एक फुट खाले जातोच जातो , तो समुद्रतलावर एक भलामोठा विस्पोट झाला,त्याचा प्रकाश इतका तीव्र होता कि चातुर्गत शेकडो फूट खोल पाहू शकत होता. हजारो किलोचा पोलादाचा जिना पाण्याखाले जात होता ,आणि दुर्दैवाने त्याच्या एका साखळीत चातुर्गाताचा पाय अडकला, तो प्रंचंड वेगाने पाण्याखले जात होता, पाण्याखालची जमीन दुभंगत होती, आणि मधोमध दुभंगलेल्या भेगीतच चातुर्गत फेकला जात होता, इतक्यात त्याच भेगीतून त्याच ठिकाणी एक भलामोठा कासव बाहेर आला,तो भक्कम पोलादी जिना त्या कासवाच्या कवच्यावर आदळला आणि जिण्याचे तुकडे झाले,चातुर्गातने डोळे उघडले, अनेक वेळा त्याने इतकेच बघितले होते , आणि ह्या वेळी पण त्याला एवढेच दिसले
चातुर्गताने आपले अंग मागे टाकले आणि आकाशाकडे बघत जीवथच्य पाठीवर पहुडला,एक तेजस्वी तारा चातुर्गतला दिसला,चातुर्गतचे भाव बदलेले , तो उठून बसला एका झेपेत त्याने ३० फुटावरून खाले उडी मारली.जीवथ ही सावध स्थितीत त्याच्या मागे उभा राहिला,काही सेकंदातच एक पांढराशुभ्र तेजस्वी रथ आकाशातून खाले उतरला. अगदी थकलेले शरीर तरीही चालीमध्ये एक विशिष्ठ लयाबाधत्ता, पाच फूट पाच इंचाचा एक तेजस्वी पुरुष त्या रथातून खाले उतरला,त्याची मुद्रा चिंताग्रस्त होती.ओठ सुरकुतलेले तरीही अजून लाली होती,सोन्याचे मुकुट आणि तशाच पिवळ्या रंगाचे पितांबर होते. त्या तेजस्वी पुरुषाच्या चेहऱ्यावरची भयग्रस्त चिंता हि सूर्याला ग्रहण लागल्या प्रमाणे वाटत होती. पुढे जाऊन कंबरेत वाकून चातुर्गाताने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला.
 "प्रणाम गुरुवर्य " चातुर्गतच्या मुखातून नम्र स्वर बाहेर आले
एक मंद स्मिथ करत त्या तेजस्वी पुरुषाने आपला हात चातुर्गतच्या वाकलेल्या पाठीवरून फिरवला. सारे ब्रम्हांड आम्हाला चित्रगुप्त नावानेच हाक मारते, आज प्रथमत: आम्हाला गुरु ही उपाधी लाभली.
 "इतके चिंताग्रस्त का" ? हलकेच चातुर्गतने विचारले.
"चला थोडी सैर घेऊ " खोटे हसत चित्रगुप्ताने उद्गार काढले.
त्या हिरव्यागार गवतावर ती दोघे संथ पावलाने चालत होती,
 "तुला काळोखाची सवय झाली तर,...." 
चातुर्गत काहीच बोलत चालत होता, काहीतरी विपरीत होण्याची चाहूल त्याच्या मनाला लागली होती.
 " आज अखेर ब्रम्हलोकात सभा झाली." 
मंद स्वरात चित्रगुप्त बोलत होते, चातुर्गात शब्द शब्द सावधपणे ऐकत होता, चित्रगुप्त बोलत होते, "ब्रम्हाजीचा आदेश आला, सगळे काही सुरळीत होते, काय हे संकट आले आणि विपरीत झाले सर्व. यमराजजी आता नरकाचे अधिपती नाहीत, ते कुठे आहेत कोणालाच कल्पना नाही
नरकाचे अधिपत्य आता देवी यामिच्या हाती देण्यात आले, त्यांचे अधिपत्य हे बऱ्याच जणांना मंजूर नाही.चारित्र्यहीन स्त्री म्हणून आजही बरेच देवलोक बोलतात, यमी वर हि जबाबदारी म्हणजे खरेच जीवघेणी आहे.ती कशी काय सामोरी जाईल ब्र्म्हजीनाच ठाऊक
आमचे पिताश्रीपण असे काही निर्णय घेतात कि.... असो 
उद्या स्वर्गलोकात ह्याचा विधी पार पडेल,ह्या सगळ्यांची चाहूल आम्हाला आधीच होती,त्यामुळे वेळेआधी देवी यामिचे शस्त्र,अस्त्र आणि वाहन तयार करणे गरजेचे होते,कारण नरकाच्या दृष्टीने देवी यामिचे वाहन आणि शस्त्रे सोयीस्कर नव्हते,म्हणूनच आम्हाला तुला आणि जीवथला इथे बोलवावे लागले.
 "भूलोकात तर तू एक वर्षे आधीच मरण पावलास, तेव्हा पासून तू इथे आहेस, ह्या कालावधीत आम्ही तुला सर्व दैवी विद्या शिकवल्या . तुझे दोन कर्तव्य असणार आहेत एक म्हणजे जिवथ ची काळजी घेणे, आणि देवी यामिचे सारथ्य करणे. आणि आणखीन गोष्ट म्हणजे" .... बोलता बोलता चीत्रगुप्ताचा आवाज स्तब्ध झाला. आम्ही तुला सर्व विद्या शिकवल्या पण कुठले शस्त्र तुला दिले नव्हते.
 "गुरुवर्य, मी समजलो नाही", नकळत चातुर्गात बोलून गेला,चित्रगुप्ताने आपले डोळे बंद केले आणि काही मंत्र पुटपुटले. त्याच्या समोर केलेल्या तळहाततून तेजस्वी किरणे बाहेर येत होती,आणि काही क्षणात त्यच्या एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात कटनी प्रस्तापित झाली
चातुर्गात डोळे फाडून ते दिव्य शस्त्र पाहत होता, त्याला त्या शास्त्राच्या शक्तीची पूर्णपणे कल्पना होती, युद्ध सुरु होणाच्या आधीच संपवून टाकण्याची त्यात शक्ती होती. "क्षमस्व ,क्षमस्व, मी हे स्वीकार करू शकणार नाही..." चातुर्गत पुन्हा कळवळला.
 "चातुर्गत...," चीत्रागुप्ताचा आवाज दीर्घ आणि कठोर होत होता "यमराजजी गेले , आमचीही सेवा इथेच संपली, घ्या आता ब्रम्हांडाचा लेख जोगा तुम्ही सांभाळा
स्वीकार करा, चतुर्गत स्वीकार करा आमची गादी. इच्छेविरुद्ध चातुर्गाताचे हात पुढे जात होते, चित्रगुप्ताने काही मंत्र म्हणण्यास सुरुवात केली, आणि नकळत चातुर्गताच्या हृदयात ते पठन होत होते, तोच चमकणारी किरणे चातुर्गताच्या हातावर येण्यास सुरुवात झाली, प्रत्येक जीवजंतूची काळजी घे, जास्त क्रूर नको होऊस आणि जास्त दयावानाही नाही, जे आहे तेच लिहित जा
चतुर्गत शुन्य नजरेने त्यांच्याकडे पाहत होता, त्यांचा रथ हा आकाशात दूरवर जात होता, प्रणाम करायचेही चातुर्गातला भान राहिले नव्हते. इतक्यात गरम हवेच्या झोताबरोबर तो भानावर आला, जिवथ मागेच उभा होता, चातुर्गतची बैचानी त्यालाही असह्य होत होती
त्याने नकळत जिवथला मिठी मारली, त्याच्या मनात असंख्य प्रश्न उभे होते, काय प्रतिकिया द्यावी हे हि त्याला नीट उमजत नव्हते. पण त्याला इथेच स्वता:लाच सावरायचे होते, त्याला सांभाळणारा तोच होता, त्याची मदत तोच करू शकत होता. कधिच संपणाऱ्या एक दुर्गम प्रवासाला तो निघाला होता. जिथून माघार येणे अशक्य

होते. होते. Reference: रीग्वेद १०.१० .http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rv10010.htm गरुडपुराण अध्याय .-३० http://www.sacred-texts.com/hin/gpu/gpu05.htmनिलमत पुराण 149http://en.wikipedia.org/wiki/Nilamata_Purana


No comments:

Post a Comment